ठाणे, दि. ८ नोव्हेंबर २०२५ —
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज सौ. सुनिता मोकाशी यांनी प्रभाग क्रमांक ०८ येथून अधिकृत उमेदवारीसाठी आपला अर्ज ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सन्मा. श्री. मनोजजी प्रधान साहेब यांच्या कडे पक्ष कार्यालयात सुपूर्त केला.

या प्रसंगी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता ताई घाग, मोजेस जी वेर, अश्विनी ताई मोरे, रोहित मोकाशी, अभय जाधव तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल करताना सौ. मोकाशी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सौ. सुनिता मोकाशी या गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे परिसरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून महिलांच्या हक्कांबाबत आणि स्थानिक विकास कामांबाबत त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यांच्या या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक ०८ मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
