हिंदी सक्तीवर हेमंत ढोमेचा संताप: "आमच्यावर हिंदी लादू नका!" राज्यात नुकतेच जाहीर झाले आहे की इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक असेल. 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024'नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदीही शिकावी लागणार आहे. इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असतील.या निर्णयावर राज्यभरात विविध स्तरांवर टीका आणि चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेदेखील आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राजकारण

हिंदी सक्तीवर हेमंत ढोमेचा संताप: “आमच्यावर हिंदी लादू नका!”