स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीत होण्याची शक्यता, वाघमारे यांची माहिती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर स्पष्टता येऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २८ टक्के ओबीसी आरक्षण मंजूर केल्यानंतर या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र निवडणुका कधी घेतल्या जातील, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नुकतीच माहिती दिली की, डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा आयोगाचा विचार आहे.
राजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीत होण्याची शक्यता, वाघमारे यांची माहिती

,