शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक दे 'धक्का'; विधानसभा लढवलेले राहुल मोटे अजित पवारांसोबत जाणार धाराशिव : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी सक्रीयपणे प्रचार केला होता, विशेष म्हणजे शिवसेना महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे समजते. त्यामुळे, धाराशिवमधून शरद पवार गटासह मविआला हा मोठा धक्का मानला जातो.  
राजकारण

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक दे ‘धक्का’; विधानसभा लढवलेले राहुल मोटे अजित पवारांसोबत जाणार

, ,