मान्सून 2025: यंदा लवकरच महाराष्ट्रात पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज यंदाच्या वर्षी मान्सूनने वेळेआधीच आपली उपस्थिती नोंदवली असून, तो सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला आहे. हवामान खात्याचे जेष्ठ वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन या भागांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे यावर्षी मान्सून लवकर येण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राजकारण

मान्सून 2025: यंदा लवकरच महाराष्ट्रात पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज