धनंजय मुंडे

धनंजय पंडितराव मुंडे (जन्म १५ जुलै १९७५) हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे झाला. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत. मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असून विद्यमान आमदार आहेत.

पद : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

संपर्क माहिती : 

  • फोन : 22025300 / 22024688  /  23646612 / 23646613
  • ईमेल : officeofdm@gmail.com / dhananjay.munde@gov.in
  • फेसबुक :
  • इंस्टाग्राम :
  • एक्स (ट्विटर) :
  • यूट्यूब :
  • थ्रेड :
  • व्हाट्सएप्प :
Scroll to Top