अंधेरी पश्चिम, मुंबई:
दादाभाई नवरोजी नगर (D.N. Nagar), अंधेरी प. येथील कामगार भवन ही इमारत वर्षानुवर्षे उभी असली तरी अजूनही ती नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील निर्भय महाराष्ट्र पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. पंडलिक खरविलकर यांनी याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षावर कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या इमारतीच्या दारात काही दिवसांपूर्वी दिवे व पंख्यांचे काम सुरू असताना पाहण्यात आले होते. आता ही इमारत “कामगार भवन” या नावाने ओळखली जात असल्याचे नामफलकावरून स्पष्ट होत आहे. मात्र, या नामफलकावर गुजराती भाषेचा वापर असून मराठीचा लवलेशही नाही, हे अधिक खटकणारे आहे.
“जर ही इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा म्हाडाच्या वतीने बांधण्यात आली असेल, तर तिचा नामफलक हा केवळ मराठीतच असायला हवा. कारण महाराष्ट्रात 1964 च्या राजभाषा अधिनियमानुसार सर्व शासकीय उद्दिष्टांसाठी मराठीचा वापर अनिवार्य आहे,” असे श्री. पंडलिक खरविलकर यांनी ठामपणे नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “ही इमारत सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून बांधली गेली आहे. मग शासनाचे अधिकारी–कर्मचारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? काय मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान त्यांना जाणवत नाही?”
त्यांनी आजच्या राज्यकर्त्यांवर देखील जोरदार टीका केली, “हे दुर्दैव आहे की आजचे सरकार गुजराती शेटच्या दावणीला बांधलेले आहे. पुन्हा एकदा भाजपायुती सरकार महाराष्ट्रविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.”
पंडलिक खरविलकर यांची मागणी —
- कामगार भवन तात्काळ जनतेसाठी खुलं करावं.
- सर्व शासकीय नामफलक व माहिती मराठीत असावी.
- महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
- संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
खरेच Bjp आणि गुजराती लोकांचे मांडलिक झालेले आहे सरकार तुमच्यात महाराष्ट्रीयन असल्याचे स्वाभिमान शिल्लक आहे कि नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मराठी लोकांना का गुजराती लोकांच्या दावणीला बांधता आहात. तुम्ही षंड झाला आहात तुमच्यामुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे. थोडी तरी लाज वाटू द्या
थोडे स्वाभिमानाला जगा
अपेक्षा करतो कि तुम्हाला लाज वाटेल.!!