कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी रस्सीखेच; भाजप-शिवसेना शिंदे गटात संघर्षाची ठिणगी ? आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत संघर्ष सुरु आहे. महापौर आपलाच असणार असा दावा भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने केला असल्याने वाद निर्माण झाला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये महापौरपदावरून जोरदार जुगलबंदी सुरू झाल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवाराला महापौर पदासाठी पुढे करत असल्याने आगामी निवडणुकीत युतीमध्ये बिघाडी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी रस्सीखेच; भाजप-शिवसेना शिंदे गटात संघर्षाची ठिणगी ?