उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात आलेल्या एका ई-मेलमध्ये ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, मुंबईतील 7 ते 8 पोलीस ठाण्यांना आणि इतर विभागांनाही असेच मेल पाठवले गेले आहेत.

मुंबई पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली असून, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबतही विचार केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे.