कुंभमेळ्यावरून राजकीय टोलेबाजी: संजय राऊत आणि प्रकाश महाजन आमनेसामने

मुंबई : प्रयागराज कुंभमेळा दौऱ्यावरून शिंदे गटाच्या शिवसेनेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुंभस्नानासाठी “पवित्र साबण” देण्याची उपहासात्मक टिप्पणी केली होती.

कुंभमेळ्यावरून राजकीय टोलेबाजी: संजय राऊत आणि प्रकाश महाजन आमनेसामने मुंबई : प्रयागराज कुंभमेळा दौऱ्यावरून शिंदे गटाच्या शिवसेनेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुंभस्नानासाठी "पवित्र साबण" देण्याची उपहासात्मक टिप्पणी केली होती.

यावर प्रतिक्रिया देत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर प्रत्युत्तर दिले. “संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकानच उघडावं,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

महाजन यांनी पुढे म्हटले की, “कुंभमेळ्यात संजय राऊत नावाचा साबण ठेवायला हरकत नाही, कारण त्यांनी इतकी पापं केली आहेत की ती धुण्यासाठी दोन जन्म घ्यावे लागतील.”

या टीका-प्रत्युत्तरामुळे शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट, आणि मनसे यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top