शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षात फूट पडली आहे. रत्नागिरी आणि दापोली नगर पंचायतीमधील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला असून, ते उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत हे नगरसेवक?
शिवसेना ठाकरे गट सोडून जाणाऱ्या नगरसेवकांची नावे –
- विलास शिगवण
- अन्वर रखांंगे
- मेहबूब तळघरकर
- संतोष कलकुटके
- अश्विनी लांजेकर
यापूर्वी हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता विकास कामांसाठी पुन्हा शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
शिवसेनेत प्रवेश कधी आणि कुठे?
- 20 फेब्रुवारी रोजी हे पाचही नगरसेवक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
- त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदपत्रांची पूर्तता केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया
- आमदार कैलास पाटील यांनी या फोडाफोडीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- “फोडाफोडीचे राजकारण थांबवा, जनतेचे प्रश्न सोडवा” असा त्यांनी इशारा दिला.
- “सत्तेसाठी शिवसैनिकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम आहे,” असे त्यांनी सांगितले.
याआधीही मोठा धक्का
- काही तासांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
- तेही 20 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राजकीय परीस्थिती अधिक ताणलेली
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने ही फूट शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
- फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.