रेल्वे प्रवासासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तिकीट बुक करता येते. मात्र, अनेक प्रवासी असा अनुभव घेतात की ऑनलाईन तिकीट काढताना काऊंटरवर मिळणाऱ्या तिकिटाच्या तुलनेत किंमत जास्त असते. यासंबंधी संसदेत प्रश्न विचारण्यात आला असता, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे कारण स्पष्ट केले.

ऑनलाईन तिकीटासाठी जादा शुल्क का?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगची जबाबदारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडे असते. ही सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी आणि तांत्रिक सुविधा अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
कोणकोणते शुल्क लागू होते?
१. सुविधा शुल्क:
IRCTC प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध करून देते. या सेवेच्या देखभालीसाठी आणि सुधारणा करण्यासाठी सुविधा शुल्क आकारले जाते.
२. ट्रान्झॅक्शन शुल्क:
ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेदरम्यान बँकांकडून घेतले जाणारे शुल्क प्रवाशांना भरावे लागते. हे ट्रान्झॅक्शन शुल्क तिकीटाच्या अंतिम किमतीत समाविष्ट होते.
IRCTC वर ऑनलाइन तिकीट महाग का?
रेल्वे ऑनलाईन तिकीट व्यवस्थापनासाठी मोठा खर्च करते. यामध्ये प्रणालीची देखभाल, सुधारणा, सायबर सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला जातो. त्यामुळेच IRCTC कडून अतिरिक्त शुल्क घेतले जाते, जे काऊंटर तिकिटांच्या तुलनेत अधिक असते.
ऑनलाईन तिकीट बुकिंग अधिक सोयीस्कर आणि वेळ वाचवणारे असले तरी, त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागते. हा शुल्क IRCTC प्रणालीच्या देखभालीसाठी तसेच ऑनलाईन व्यवहारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळेच ऑनलाईन तिकीटाच्या किमती काऊंटरवर मिळणाऱ्या तिकिटांच्या तुलनेत थोड्या जास्त असतात.