संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप : महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये पाठवण्याची तयारी?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी थेट आरोप केला की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या ईव्हीएम मशीनचे पॅकींग सुरु झाले असून त्या ईव्हीएम आता पश्चिम बंगालमध्ये पाठवल्या जाणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, आणि त्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी ही तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप : महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये पाठवण्याची तयारी? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी थेट आरोप केला की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या ईव्हीएम मशीनचे पॅकींग सुरु झाले असून त्या ईव्हीएम आता पश्चिम बंगालमध्ये पाठवल्या जाणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, आणि त्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी ही तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, हे सगळं पूर्वनियोजित आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनी यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार येईल असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील ईव्हीएम मशीन पश्चिम बंगालमध्ये पाठवण्याचा प्रयत्न म्हणजे भाजपच्या त्या दाव्याच्या मागे काही घडामोडी सुरु असल्याचे सूचित करते, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकेचा भडिमार केला. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, अजित पवार यांना जबाबदार धरले आणि त्यांचा राजीनामा मागितला. राऊत म्हणाले की, या योजनेचा लाभ केवळ महिलांनीच नाही तर अनेक पुरुषांनीही घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आणि लाभ घेतला. हे सगळं अर्थखात्याच्या नियंत्रणाखाली घडलं असून, ते रोखण्याची जबाबदारी अजित पवार यांची होती, असं त्यांनी ठामपणे म्हटलं.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत अर्जांची योग्य छाननी न करता लाभ मंजूर करण्यात आला, कारण त्यातून निवडणुकीत मते मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आता या गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांवर आणखी टीका

राज्यातील राज्यमंत्र्यांना अद्याप कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार देण्यात आलेले नाहीत, यावरूनही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “राज्यमंत्र्यांनाच नव्हे, तर खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनाही अधिकार नाहीत. ना राज्यात, ना केंद्रात,” असं त्यांनी उपरोधिकपणे म्हटलं. अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या कार्यालयातून दोन कोटी रुपये सापडले तरी कोणतीही कारवाई झाली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कुंभमेळ्याच्या पॅकेजवर टीका

मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. प्रयागराजमधील कुंभमेळ्यासारखं हे पॅकेज असून, सर्व ठेके गुजरातच्या ठेकेदारांना मिळणार आहेत, असा आरोप त्यांनी केला. “आपले साधू भजन करत येतील आणि स्नान करून निघून जातील, पण सगळी कमाई मात्र बाहेरच्यांची होईल,” अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top