उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक – एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उधमपूर जिल्ह्यातील डुडु-बसंतगड परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत भारताचा एक जवान वीरमरण पावला असून, कारवाई अद्याप सुरू आहे.

उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक – एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उधमपूर जिल्ह्यातील डुडु-बसंतगड परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत भारताचा एक जवान वीरमरण पावला असून, कारवाई अद्याप सुरू आहे.

सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यानंतर जोरदार सर्च ऑपरेशन राबवायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उधमपूरमधील डुडु-बसंतगड भागात काही संशयित हालचाली आढळून आल्या आणि त्यानंतर तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला आणि प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही कारवाई सुरू केली. या संघर्षात एका जवानाला वीरमरण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने सध्या दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून, ते पाकिस्तानातून आलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी रामनगर भागातही गोळीबार केला होता, अशी माहिती मिळाली आहे. परिसरात अजूनही अडथळे निर्माण होत असून, थोड्या थोड्या वेळाने गोळीबार सुरू आहे.

या घटनेच्या काही तास आधी बारामुल्ला भागातही लष्कराने मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्याकडून दोन AK-सीरिज रायफल्स, चिनी बनावटीचे पिस्तूल, मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि 10 किलो वजनाचा आयईडी जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांचा उद्देश मोठा हल्ला घडवून आणण्याचा होता, पण वेळेवर हस्तक्षेप करत त्यांचा कट उधळून लावण्यात आला.

पहलगाममधील हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी तिथे पर्यटकांच्या गाड्यांवर हल्ला करत त्यांचा धर्म विचारला. या घटनेत हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका स्थानिक मुस्लिमालाही गोळ्या घालण्यात आल्या. या अमानुष हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून, काश्मीर खोऱ्यात 100 पेक्षा अधिक सक्रिय दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. या प्रकारच्या चकमकी ही केवळ दहशतवाद्यांवरील कारवाईच नाही, तर देशाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेले ठोस पावले आहेत. भारत आता अशा घटनांना केवळ निषेध करत थांबणार नसून, थेट कृती करून त्याला प्रत्युत्तर देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top