कृषी क्षेत्रातील एआयचा वापर : अजित पवार यांचे मोठे विधान

पुण्यातील साखर संकुलात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एकत्र आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.

कृषी क्षेत्रातील एआयचा वापर : अजित पवार यांचे मोठे विधान पुण्यातील साखर संकुलात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एकत्र आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.

अजित पवार म्हणाले की, “शेतीत एआयच्या वापरामुळे उत्पादन वाढते, पाण्याची बचत होते आणि रासायनिक खते व पाण्याचा वापर मर्यादित होतो. यासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.” त्यांनी सांगितले की, ऊस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका या सहा पिकांवर प्रायोगिक तत्त्वावर एआयचा वापर सुरू करण्यात येणार आहे. मातीची सुपीकता वाढवणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत कृषी क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही एआयचा वापर कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली. अजित पवार म्हणाले की, “पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या रयत शिक्षण संस्थेचे मी ट्रस्टी आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या माध्यमातूनही एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल यावर आम्ही चर्चा केली.”

यावेळी अजित पवार यांना भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी थोडक्यात प्रतिसाद देताना म्हणाले, “मग मी काय करु?” संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार होते, आता ते पराभूत झाले आहेत, त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे, त्यावर मला काही बोलायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांबाबत अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र आले होते. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा आहे की कुटुंबीय आनंदाच्या प्रसंगी एकत्र येतात. या गोष्टींवर इतरांनी फार चर्चा करू नये. हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे.”

शेवटी अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनांबाबतही माहिती दिली. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे विभागात एकूण ३५ हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला असून, ही घरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधली जातील आणि त्यांचे आयुष्य ८० वर्षांपर्यंत टिकेल, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top