उद्धव-राज ठाकरे युतीची शक्यता? संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवायला हरकत नाही” असे सूचक वक्तव्य केले. त्यावर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव-राज ठाकरे युतीची शक्यता? संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवायला हरकत नाही" असे सूचक वक्तव्य केले. त्यावर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “इथेही ठाकरे आहेत आणि तिथेही. नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले, त्यामुळे वेगळे वाट चाले, पण उद्धव ठाकरे यांचा पथ नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचा राहिला आहे.” राज ठाकरे यांच्या ताज्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, सर्व वाद मिटवण्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनीही स्पष्ट केले आहे, असे राऊतांनी सांगितले.

मात्र युतीसाठी काही अटीही त्यांनी नमूद केल्या. संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळातही सातत्याने सांगत होते की, महाराष्ट्राच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणाऱ्या शक्तींशी कोणताही संबंध ठेवू नये. आमची युतीही याच तत्वावर आधारलेली होती. परंतु जेंव्हा शिवसेनेला तोडण्याचा कट रचला गेला, तेंव्हा आम्हाला बाजूला व्हावे लागले.”

ते पुढे म्हणाले, “आजही काही शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात पडद्यामागून काम करत आहेत. त्या शक्तींच्या हातात हात घालणं महाराष्ट्राच्या हितासाठी घातक आहे. त्यामुळे ज्या कुणाची भूमिका महाराष्ट्राच्या शत्रूंविरोधात असेल, मराठी माणसाच्या हितासाठी असेल, अशा प्रत्येकाचा आम्ही स्वागत करू. पण जर कोणी महाराष्ट्रविरोधी शक्तींसोबत असेल, तर त्यांच्यासोबत कोणताही संवाद शक्य नाही.”

संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, राजकीय गणिताच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे हित जपणं आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एकत्र येणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे. कोणतीही युती किंवा सोबत फक्त या तत्वांवर आधारित असेल.

यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या शक्यतेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी काळात या दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत अधिक स्पष्टता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top