ठाकरे गटाला आणखी एक हादरा, शिंदे गटात मोठी भर

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर संकटांची मालिका सुरुच आहे. आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील काही प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, मुंबईतील माजी नगरसेविका आणि पक्ष प्रवक्त्या संजना घाडी यांनी थेट शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. या सोबतच अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि पदाधिकारी वर्गानेही शिंदे गटात आपली निष्ठा दर्शवली.

ठाकरे गटाला आणखी एक हादरा, शिंदे गटात मोठी भर विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर संकटांची मालिका सुरुच आहे. आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील काही प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, मुंबईतील माजी नगरसेविका आणि पक्ष प्रवक्त्या संजना घाडी यांनी थेट शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. या सोबतच अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि पदाधिकारी वर्गानेही शिंदे गटात आपली निष्ठा दर्शवली.

मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात तब्बल १८ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. या यादीत माजी नगरसेवक, युवा सेनेचे कार्यकर्ते, शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख अशा विविध पातळीवरील नेत्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करत ही भर शिवसेना शिंदे गटासाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

शिंदे गटात सामील झालेले प्रमुख चेहरे:

संजना संजय घाडी – माजी नगरसेविका व प्रवक्त्या

संजय शंकर घाडी – माजी नगरसेवक

सुयश संजय घाडी – युवा सेना, ठाणे लोकसभा

सागर पांचाळ, नितेश माने, समीर बोरकर – उपशाखाप्रमुख

प्रदीप नेगी, तानाजी जाधव, आशिष गावडे – युवा सेनेचे प्रमुख

मोहम्मद सय्यद – व्यापारी सेना अध्यक्ष, मागठाणे

नरसिंह दळवी, गुरु सावंत, अपूर्व शाहा, मंजुनाथ येलगुट्टी, लक्ष्मण राडे – गटप्रमुख

पौर्णिमा सावंत, मेघा दळवी – महिला पदाधिकारी

जयेश दवे – उपशाखाप्रमुख

या घडामोडीमुळे मुंबईत ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरती मोहिमेने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हं आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top