आदित्य ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान – ‘हेच असेल खरं राम राज्य तर…

राम नवमीच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. “तुमचं खरं हिंदुत्व असेल तर आयोध्येतील जमीन लोढा आणि अदानी यांच्याकडून परत घेऊन ती गरिब जनतेसाठी वापरा,” असा थेट संदेश त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान – ‘हेच असेल खरं राम राज्य तर... राम नवमीच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. “तुमचं खरं हिंदुत्व असेल तर आयोध्येतील जमीन लोढा आणि अदानी यांच्याकडून परत घेऊन ती गरिब जनतेसाठी वापरा,” असा थेट संदेश त्यांनी दिला.

ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी नेहमीच स्पष्ट केलं आहे की, आमचं हिंदुत्व हे ‘हृदयात राम आणि हाताला काम’ या तत्त्वावर आधारित आहे.” त्यांनी भाजपच्या रामराज्याच्या संकल्पनेवरही प्रश्न उपस्थित करत सांगितलं – “गरिबांसाठी न्याय आणि संधी निर्माण केली, तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू.”

त्यांनी आयोध्येत दिलेल्या जमिनी उद्योगपती लोढा आणि अदानी यांच्या ताब्यात का दिल्या गेल्या, असा सवाल करत त्या परत घेण्याची मागणी केली. या विधानामुळे राज्यातील आणि देशपातळीवरील राजकारणात पुन्हा एकदा हिंदुत्व आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर घमासान रंगण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top