लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक काल संमत करण्यात आले असून, २८८ विरुद्ध २३२ मतांनी त्याला मंजुरी मिळाली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले होते आणि लवकरच ते राज्यसभेत मांडले जाणार आहे.

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या ईदनंतर हे विधेयक मांडले जाणे हा एक योगायोग आहे की ठरवून केलेला निर्णय? त्यांनी पुढे किरेन रिजिजू यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण यापूर्वी त्यांनी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते.
ठाकरेंनी भाजपच्या भूमिकेतील विसंगतीवरही भाष्य केले. औरंगजेबाच्या कबरीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, भाजपकडून कधी कबर खोदण्याची भाषा केली जाते, तर नंतर त्याच कबरीवर माती टाकण्याचे आदेश दिले जातात. तसेच, मशिदीवरील कारवाईबाबतही भाजपची भूमिका गोंधळलेली असल्याचे ते म्हणाले.
ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.