टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे मृत्यूपत्र समोर आले असून, त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा वाटा सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, रतन टाटा यांची संपत्ती अंदाजे 3,800 कोटी रुपये आहे, ज्यातील बहुतांश भाग ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ आणि ‘रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट’ला दिला गेला आहे.

कुटुंबीय आणि मित्रांसाठी संपत्तीचे वाटप
- शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय – टाटांच्या सावत्र बहिणींना सुमारे 800 कोटी रुपयांची संपत्ती दिली जाणार आहे, ज्यात बँक ठेव, मौल्यवान घड्याळे आणि कलाकृतींचा समावेश आहे.
- जिमी नवल टाटा – टाटांच्या भावास जुहूतील बंगल्याचा काही भाग तसेच चांदीची भांडी आणि दागिने मिळणार आहेत.
- मेहली मिस्त्री – त्यांच्या जवळच्या मित्राला अलिबागमधील बंगला आणि तीन मौल्यवान बंदुका, ज्यात .25 बोअर पिस्तूलही आहे, भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
- शंतनू नायडू – रतन टाटा यांच्या विश्वासू सहकाऱ्याचे शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे.
पाळीव प्राण्यांसाठीही तरतूद
टाटा यांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठी 12 लाख रुपयांची तरतूद केली असून, प्रत्येक प्राण्यास तिमाही 30,000 रुपये मिळतील.
मालमत्तेचे वितरण कधी होणार?
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राची न्यायालयाकडून पुष्टी झाल्यानंतर संपत्तीचे वाटप करण्यात येईल. याला सुमारे सहा महिने लागू शकतात.