भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. संजय राऊत यांचा उल्लेख त्यांनी ‘उबाठाचा पोपट’ आणि ‘रडत राऊत’ असा करत त्यांच्यावर निशाणा साधला.

चित्रा वाघ म्हणाल्या, “संजय राऊत आता भाकड भविष्यवाणी करत फिरत आहेत. स्वयंघोषित विश्वगुरूंनी आधी आपल्या घराकडे लक्ष द्यावे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही.”
याशिवाय, त्यांनी संजय राऊत यांना खोचक सल्ला देताना म्हटले की, “बीजेपीच्या भविष्यासंदर्भात बोलण्याआधी स्वतःच्या पक्षातील फाटाफूट सांभाळा.” तसेच, उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करत, “त्यांना विधान परिषद आमदार असल्याचे विसर पडले आहे, लवकरच त्यांच्या गटाचे अस्तित्वसुद्धा उरणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.