राजकीय वर्तुळात खोक्या भोसले प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी माजी मंत्री सुरेश धसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, “सुरेश धस हे खोक्यांचे आका आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून त्यांचे आणि खोक्यांचे संबंध उघड झाले आहेत. जसे वाल्मिक कराड प्रकरणात आका धनंजय मुंडे असल्याचे बोलले गेले, तसेच आता सुरेश धसांचेही पुरावे समोर येत आहेत.”
पुढे त्या म्हणाल्या, “धसांना कोणते डबे पुरवले गेले, हे फक्त त्यांना आणि खोक्याला माहिती आहे. स्वतःचे नाव वाचवण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी ते मोठी नाटके करत आहेत. जर खरंच त्यांना बिश्नोई गँगकडून धमक्या आल्या असत्या, तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार का दिली नाही?”
त्याचबरोबर, “धसांना कोणीही व्हिलन ठरवले नाही, पण बीडच्या राजकारणात त्यांना हिरो बनायचंय,” असे म्हणत तृप्ती देसाईंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.