गोव्यात समाजवादी नेते अबू आझमी यांच्या मुलाची दहशत, फरहान आझमीने बंदुकीने धमकावले

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या मुलगा फरहान आझमीचा गोव्यातील गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. गोव्यात यू-टर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील वाहनाचा हलका धक्का लागल्यावर फरहान आझमीने थेट बंदूक काढून संबंधित चालकाला धमकावले.

गोव्यात समाजवादी नेते अबू आझमी यांच्या मुलाची दहशत, फरहान आझमीने बंदुकीने धमकावले समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या मुलगा फरहान आझमीचा गोव्यातील गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. गोव्यात यू-टर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील वाहनाचा हलका धक्का लागल्यावर फरहान आझमीने थेट बंदूक काढून संबंधित चालकाला धमकावले.

घटनेचे तपशील

हा प्रकार गोव्यातील कलंगुट बीचजवळ घडला. फरहान आझमी मर्सिडीज जी-वॅगन कारमधून जात असताना कांदोळी परिसरात हा वाद झाला. इंडिकेटर न दाखवता त्याने वळण घेतल्याने मागील वाहनाने त्याच्या कारला धक्का दिला. यावरून वाद वाढला आणि संतापाच्या भरात फरहानने बंदूक काढली.

पोलिसांनी घेतली ताब्यात

या घटनेनंतर गोवा पोलिसांनी फरहान आझमीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे.

अबू आझमी वादाच्या भोवऱ्यात

यापूर्वी अबू आझमी यांनी औरंगजेबबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा सामना केला होता. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांच्या मुलाच्या या कृत्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

गोवा पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top