विधानपरिषदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस मोठ्या गदारोळात पार पडला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या दबावामुळे संपूर्ण वातावरण तापले होते.

मुख्यमंत्र्यांसोबत 15 मिनिटांची चर्चा
अधिवेशनानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 15 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. याआधी भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला अधिक उधाण आले.
विरोधकांचा वाढता दबाव
राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक आक्रमक असून, करुणा शर्मा यांनीही 100% राजीनामा होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.