उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा – विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधिमंडळाकडून मोठी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. त्यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा – विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधिमंडळाकडून मोठी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. त्यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महायुतीला मोठे यश, महाविकास आघाडीला फटका

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवत 232 आमदार निवडून आणले, तर महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि काँग्रेस यांना 10 टक्के आमदारसंख्या मिळालेली नव्हती, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद नसेल, अशी चर्चा सुरू होती.

ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिले

शिवसेनेने यासंदर्भात 25 नोव्हेंबर 2024 रोजी विधिमंडळ सचिवांकडे पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी विचारले की, 10 टक्के आमदारसंख्या पूर्ण नसल्यास विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही, असा कोणता नियम आहे का? या पत्राला आता उत्तर मिळाले असून, महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये अशी कोणतीही अट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता वाढली आहे.

अंबादास दानवे यांचे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

विधानसभेत शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार जास्त असल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. मात्र, विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य संख्येने जास्त असल्याने काँग्रेसने तिथे दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे.

या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे, आणि ठाकरे गटाचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top