अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी अंबादास दानवे आक्रमक

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापले आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना (ठाकरे गट) आपला दावा मांडण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी अंबादास दानवे आक्रमक महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापले आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना (ठाकरे गट) आपला दावा मांडण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सभागृहात गदारोळ

माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट मिळविल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधक त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही आहेत. अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले. मात्र, विरोधकांचा रोष कायम राहिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे

राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच, या अधिवेशनात पुढील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे:

  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
  • कृषी खात्यातील कथित घोटाळा आणि त्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
  • केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणासह महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा

या सर्व मुद्द्यांवर सरकारला विरोधकांकडून कडाडून प्रश्न विचारले जाणार असून, अधिवेशनाचे पुढील काही दिवस राजकीय घडामोडींनी भरलेले असतील, अशी शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top