‘चल हल्ला बोल’ या चित्रपटातील कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आणि ‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न उपस्थित केला. या वक्तव्यावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची तीव्र प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले –
“नामदेव ढसाळ कोण?” असा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्याला चपराक रंगवायला हवी होती. हा माणूस दलित पँथर चळवळीचा संस्थापक आणि बंडखोर कवी होता. अशा व्यक्तीची ओळख नसेल तर तो सांस्कृतिक दहशतवाद आहे.”
काय आहे संपूर्ण प्रकरण?
- ‘चल हल्ला बोल’ चित्रपट १ जुलै २०२४ रोजी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला.
- चित्रपटातील काही कवितांमध्ये अश्लीलता आणि शिवीगाळ असल्याचा आक्षेप बोर्डाने घेतला.
- निर्मात्यांनी स्पष्ट केले की, त्या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्या आहेत.
- त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही!’
- या वक्तव्यावर साहित्य, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आव्हाडांचा पुढील पाऊल
जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून सोमवारी (मार्च ३, २०२५) सिंचन बोर्डाच्या सीईओंशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “जर सरकारला याची चिंता नसेल तर त्या अधिकाऱ्याला दिल्लीला पाठवावे. आपण सगळे षंड बनलो आहोत. जर आवाज उठवला नाही, तर आयुष्यभर असेच षंड राहावे लागेल.”
ही बाब केवळ चित्रपट किंवा सेन्सॉर बोर्डापुरती मर्यादित नसून, एकूणच सांस्कृतिक आणि सामाजिक विचारधारांवर पडणाऱ्या बंधनांविरोधात आवाज उठवण्याची वेळ आल्याचे आव्हाड यांनी सूचित केले आहे.