बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. काँग्रेसने दावा केला होता की भाजपने तिचे 18 कोटींचे कर्ज माफ करण्यास मदत केली आणि तिचे सोशल मीडिया अकाउंटही हाताळले जात आहे. या आरोपांवर प्रितीने तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

प्रिती झिंटाची सडेतोड प्रतिक्रिया
या आरोपांवर प्रितीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले, “माझे सोशल मीडिया अकाउंट मी स्वतः सांभाळते. खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल लाज वाटली पाहिजे.”
तसेच, एका सोशल मीडिया युजरने विचारलेल्या “राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार का?” या प्रश्नाला उत्तर देताना तिने स्पष्ट केले, “मी कोणालाही विनाकारण दोष देणार नाही. राहुल गांधींशी मला काही समस्या नाहीत. त्यामुळे त्यांनी शांततेत जगावे आणि मलाही जगू द्यावे.”
राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरील चर्चा
काँग्रेसच्या केरळ युनिटने सोशल मीडियावर पोस्ट करून हा आरोप केला होता, ज्यावरून वाद निर्माण झाला. प्रिती झिंटाने हे आरोप फेटाळले आणि सांगितले की एका राजकीय पक्षाने तिचे नाव आणि फोटो गैरवापर करून दिशाभूल करणारी माहिती पसरवली आहे.
प्रिती झिंटा लवकरच सिनेसृष्टीत पुनरागमन करणार
या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रिती झिंटा तिच्या आगामी ‘लाहोर 1947’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असून, यात सनी देओल आणि करण देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.