ठाणे महापालिकेच्या मराठी भाषेसंदर्भातील जीआरवर मनसे आक्रमक

आज २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिन, आणि याच दिवशी ठाणे महापालिकेच्या एका जीआरमुळे वाद निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या मराठी भाषेसंदर्भातील जीआरवर मनसे आक्रमक आज २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिन, आणि याच दिवशी ठाणे महापालिकेच्या एका जीआरमुळे वाद निर्माण झाला आहे.

जीआरमध्ये नेमकं काय आहे?

  • ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने मराठीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख असलेला जीआर काढला.
  • हा निर्णय समोर येताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांचा थेट इशारा

  • “मराठीतून शिकलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नसेल, तर मग कोण मराठीतून शिक्षण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
  • त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून, संध्याकाळपर्यंत हा जीआर मागे घ्यावा लागेल, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
  • ठाणे महापालिकेने मराठी भाषा दिनानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.

सरकारवर टीका

  • “निवडणुकीच्या वेळी मराठी आठवते, पण प्रत्यक्ष कृती शून्य!” अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.
  • “जर हा जीआर मागे घेतला नाही, तर उद्यापासून पुन्हा आंदोलन करु,” असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

  • मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.
  • ठाणे महापालिकेच्या या निर्णयावर सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top