रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली – ‘मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार’

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील त्यांना ऑफर दिली, त्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला.

रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली – ‘मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार’ काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील त्यांना ऑफर दिली, त्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला.

मात्र, या चर्चांदरम्यान रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार’. त्यांच्या या विधानामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रूपाली ठोंबरे यांच्या ऑफरवर काय म्हणाले धंगेकर?

धंगेकर यांना राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे यांनी ऑफर दिली, यावर ते म्हणाले –
“प्रेमापोटी ताईने बोललं. तिला वाटतं की माझ्यासोबत मी काम करावं. पण मला सगळ्या पक्षात जावं वाटलं तरी मी थोडी जाऊ शकतो? मी एकटाच आहे, त्यामुळे मी किती पक्ष बदलू शकतो?”

शिवसेनेत प्रवेश निश्चित?

शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण त्या फेटाळून लावत धंगेकर म्हणाले –
“निर्णय घ्यायचा की नाही, ते आपल्या हातात असतं, पण चर्चा होत राहतात. एखाद्याला भेटलो म्हणजे लगेच पक्ष बदलतो असं नसतं.”

धंगेकर यांनी काँग्रेस पक्षासोबत असल्याची भूमिका ठामपणे मांडली असून, पक्षप्रवेशाच्या चर्चा फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top