सुषमा अंधारे यांचा नीलम गोऱ्हेंवर तीव्र हल्लाबोल: “नाक घासा, माफी मागा… अन्यथा परिणाम भोगावे लागतील”

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की, शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या. या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे यांचा नीलम गोऱ्हेंवर तीव्र हल्लाबोल: "नाक घासा, माफी मागा... अन्यथा परिणाम भोगावे लागतील" दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की, शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या. या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना थेट आव्हान दिले – “तुमच्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर ते कोर्टात सिद्ध करा, अन्यथा नाक घासून माफी मागा!” त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, जर गोऱ्हेंनी आपले आरोप मागे घेतले नाहीत, तर त्यांचे जुने कारनामे उघड करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

अंधारे पुढे म्हणाल्या, “नीलम गोऱ्हेंनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली, परंतु त्यांच्यात ठोस कर्तृत्व नाही. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक वेळा निष्ठा बदलली आहे. सुरुवातीला एसएफआयमध्ये काम करून, त्यांनी नंतर भारिप बहुजन महासंघमध्ये प्रवेश केला. प्रकाश आंबेडकरांमुळे त्यांना ओळख मिळाली, पण त्यांनाही त्यांनी धोका दिला. त्यानंतर शरद पवारांकडे वळल्या आणि शेवटी शिवसेनेत आल्या.”

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियेवर आता नीलम गोऱ्हे काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top