पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच, आता आरोपी दत्तात्रय गाडे याचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघडकीस आलं आहे.

त्याच रात्री आरोपीने आणखी एका महिलेची छेड काढली!
पोलिसांच्या तपासात बलात्काराच्या घटनेच्या त्याच रात्री दत्ता गाडेने दुसऱ्या एका महिलेची छेड काढल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर आरोपीने पीडितेचा गळा दाबून ठार मारण्याची धमकीही दिली होती.
पीडितेची हृदयद्रावक याचना
बलात्काराच्या घटनेदरम्यान पीडित तरुणीने आरोपीला “काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव” अशी याचना केली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
दोन वेळा अत्याचाराचा खुलासा
- स्वारगेट एसटी स्टँड: पहाटे 5:30 वाजता, फलटणला जाण्यासाठी पीडिता बसची वाट पाहत होती.
- दत्तात्रय गाडे: पीडितेला “ताई, कुठे जायचं आहे?” असं विचारत जवळ गेला.
- अत्याचार: पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर अत्याचार केला.
- दुसरी छेडछाड: त्याच रात्री दुसऱ्या एका महिलेची छेड काढली.
आरोपीच्या विरोधात आधीपासून तक्रारी दाखल
- दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
- पोलिस तपासानुसार आरोपीने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यात संतापाची लाट – आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी
या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. प्रशासनाकडून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीवर गंभीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.