पुण्यात शिवशाही बसमध्ये घडलेल्या अमानुष घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो एका राजकीय बॅनरवर दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

राजकीय बॅनरवर आरोपीचा फोटो
शिरूर तालुक्यात लावण्यात आलेल्या माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर आरोपी गाडेचा फोटो आढळला. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत असल्याचे दिसत आहे. अशोक पवार यांनी गाडेचा राजकीय संबंध कोणाशी आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गाडेचा राजकीय संपर्क?
गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. तसेच, तो गावात आमदार कटके यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता, अशी माहिती मिळाली आहे.
राजकीय वर्तुळात नवा वाद
या प्रकरणानंतर गाडेचे राजकीय कनेक्शन काय आहे? त्याचा कोणत्या नेत्यांशी संबंध आहे? याबाबत चौकशी होण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.