पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत गाडेच्या मानेवर जखमा आढळून आल्या आहेत.

गाडे याला मध्यरात्री अटक करण्यात आली होती. अटकेनंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर काही खुणा असल्याचे दिसले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. गाडेने सांगितल्यानुसार, गळफास घेण्याच्या प्रयत्नात दोरी तुटली आणि लोकांनी वेळीच पाहून त्याला वाचवले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.