स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर, परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर, परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले

परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटी आगारातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. स्वारगेट आगारात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचा मागोवा घेणे शक्य झाले, त्यामुळे भविष्यात अधिकाधिक ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवले जातील.

तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जीपीएस प्रणाली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर केला जाईल.

बस व्यवस्थापनात तांत्रिक सुधारणा

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, सध्या 14,300 बस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत, त्यातील 400 इलेक्ट्रिक बस आणि 350 भाडेतत्त्वावर घेतलेल्या बस आहेत. भविष्यात सर्व बसमध्ये GPS आणि AI प्रणाली बसवण्यात येईल, जेणेकरून बसची स्थिती आणि सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.

मोडकळीस आलेल्या बससाठी स्क्रॅपिंग पॉलिसी

एसटी महामंडळाच्या आगारात अनेक बंद बस आणि निष्क्रिय वाहनं पडून आहेत, जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे परिवहन विभागाने स्क्रॅपिंग पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिलपर्यंत ही वाहने भंगारात देण्यात येणार आहेत, ज्यामुळे गैरप्रकारांना आळा घालता येईल.

सुरक्षा व्यवस्थेसाठी IPS अधिकारी

सध्या एसटी महामंडळात 2700 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत, मात्र त्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे महिला सुरक्षारक्षकांची संख्या 10-15% ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, आगाराच्या विविध ठिकाणी AI कॅमेरे बसवून त्यांचे मॉनिटरिंग कंट्रोल रूममधून केले जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे, एसटी महामंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी एका IPS अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. यामुळे आगारातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत आणि प्रभावी होईल.

स्वारगेट एसटी आगारात घडलेल्या प्रकारानंतर परिवहन विभागाने सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, CCTV कॅमेरे, GPS आणि महिला सुरक्षारक्षकांची वाढ यामुळे एसटी महामंडळाची सुरक्षा अधिक बळकट केली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top