सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना अखेर परत घेण्यात आला आहे. संबंधित बारचा परवाना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचे समोर आल्याने राजकीय वातावरण तापले होते. या बारवर याआधी पोलिसांनी धाड टाकली होती आणि काही महिलांचा अनैतिकरीत्या वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
या घटनेनंतर विरोधकांनी राजकीय आरोप करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागितला आहे. तर, कदम यांनी या आरोपांना खोडून काढत ते केवळ राजकीय हेतूने करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. ते विधानसभेत या आरोपांविरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

या पार्श्वभूमीवर बारमधील केवळ ऑर्केस्ट्रा परवाना परत घेण्यात आला असून, अन्य परवाने – जसे की गुमास्ता, मद्यविक्री आणि खाद्य परवाने – हे कायम आहेत. त्यामुळे बार पूर्णपणे बंद झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत घेतल्यामुळे काही काळापुरते तरी राजकीय वाद शांत होतील, मात्र विरोधक या मुद्यावरून सरकारला अजूनही घेरण्याच्या तयारीत आहेत.