शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर तीव्र टीका केली आहे. “वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे”, असे धनंजय मुंडे आधीच म्हणाले होते, असा दावा करत क्षीरसागर यांनी विचारले, “निकटवर्तीय असल्याने गुन्हे करण्याची मोकळीक देता का?”

वाल्मिक कराडवर कारवाई का झाली नाही?
संदीप क्षीरसागर यांनी “गंभीर गुन्हा घडूनही कारवाई करण्यात उशीर का झाला?” असा सवाल उपस्थित केला आहे. “वाल्मिक कराड हा काही मोठा व्यक्ती नाही, मात्र तो मास्टरमाईंड असल्याचे चार्जशीटमध्ये स्पष्ट झाले आहे. मग पोलिस प्रशासन शांत का होते?” अशी त्यांनी विचारणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या कार्यक्रमात नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
क्षीरसागरांचा संतप्त सवाल
संदीप क्षीरसागर यांनी पुढे विचारले, “मुंडेंनीच सांगितले होते की कराड माझा निकटवर्तीय आहे. मग अशा व्यक्तींना संरक्षण का दिले जात आहे? पोलीस प्रशासन कारवाईसाठी थांबले होते का?”
पुढील तपास महत्त्वाचा
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, आता धनंजय मुंडे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.