संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट : मस्साजोगमध्ये अज्ञात महिलेची हलचल, कृष्णा आंधळेशी नातं?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातल्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सारा परिसर अजूनही हादरलेला असतानाच, या प्रकरणात एक नवी आणि गूढ घटना घडली आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पकडला गेलेला नाही. अशातच देशमुख कुटुंबीयांच्या घराजवळ एक अनोळखी महिलेचा संशयास्पद वावर पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट : मस्साजोगमध्ये अज्ञात महिलेची हलचल, कृष्णा आंधळेशी नातं? बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातल्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सारा परिसर अजूनही हादरलेला असतानाच, या प्रकरणात एक नवी आणि गूढ घटना घडली आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पकडला गेलेला नाही. अशातच देशमुख कुटुंबीयांच्या घराजवळ एक अनोळखी महिलेचा संशयास्पद वावर पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

ही महिला थेट देशमुखांच्या घराजवळील पॅंडॉलमध्ये आली आणि तिथेच तळ ठोकून बसली. विशेष म्हणजे, या महिलेने स्वतःला कृष्णा आंधळेशी जोडले असल्याचा दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे कृष्णा आंधळेविरोधात महत्त्वाचे पुरावे आहेत. तिने सुरुवातीला पोलिसांशी संवाद साधताना कोणतीही माहिती देण्यास नकार दिला, तसेच आपलं नाव सांगण्यासही टाळाटाळ केली.

महिलेची वागणूक संशयास्पद होती. ती देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्याचा आग्रह धरू लागली. घरातील बाथरूम न वापरता इतरत्र सोय करून देण्यात आली, तरीही तिने हट्टाने देशमुखांच्या घरातीलच बाथरूम वापरण्याची मागणी कायम ठेवली. अखेर, संपूर्ण रात्र तिने पॅंडॉलमध्येच काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केज पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर बसने तेथून रवाना झाली.

ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे पुढे उघड झाले आहे. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धनंजय देशमुख यांनीही याबाबत माहिती दिली असून, पोलिसांकडून तपास गतीमान करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे, ती रत्नागिरीहून कोल्हापूर, पुणे, बारामती, दौंड, जामखेड, अंबाजोगाई मार्गे 30 तासांचा प्रवास करून मस्साजोग येथे पोहोचली. ती धनंजय देशमुख यांना काही खास माहिती द्यायची असल्याचा पुनःपुन्हा उल्लेख करत होती. तसेच तिचे दामनिया नावाचे एक खास मित्र असल्याचे आणि वैभवी देशमुख टीव्हीवर दिसते असा दावा तिने केला.

या घटनेनंतर मस्साजोगमध्ये वातावरण अधिकच तापले आहे. हत्येप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आणि या महिलेचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही महिला खरोखर पुरावे घेऊन आली होती का, की केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, हे लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा जोरदार शोधमोहीम राबवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top