संतोष देशमुख हत्या प्रकरण: नवीन माहिती उघड, आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे हत्येच्या वेळी ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात रोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: नवीन माहिती उघड, आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे हत्येच्या वेळी ऑनलाईन बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात रोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून थेट व्हिडिओ कॉल

सीआयडीच्या चार्जशीटनुसार, आरोपींनी हत्या करताना ‘मोकारपंथी’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून थेट व्हिडिओ कॉल केला होता. या कॉलद्वारे आरोपी कृष्णा आंधळेने संतोष देशमुख यांची हत्या कशी केली जात आहे, हे दाखवले होते. हा व्हिडिओ कॉल काही मिनिटे सुरू होता, त्यामुळे या क्रूर घटनेला अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले असण्याची शक्यता आहे.

आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार

या हत्येच्या घटनेत मुख्य संशयित असलेल्या कृष्णा आंधळेचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, त्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

क्रूरतेचा कळस – पुराव्यांमध्ये धक्कादायक दृश्ये

या हत्येच्या घटनेतील क्रौर्य उघड करणारे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांना मिळाले आहेत. आरोपींनी संतोष देशमुख यांना विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे उघड झाले आहे.

राज्यभर संताप, आंदोलन तीव्र

या हत्येच्या व्हिडिओसमोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त आंदोलकांनी धनंजय मुंडे यांना फाशी देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. लातूरमध्येही मराठा समाज आक्रमक झाला असून, आरोपींचे फोटो जाळण्यात आले आहेत. तसेच, धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत.

ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ माजवत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top