शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिंदे यांच्यावर “दिल्लीसमोर वारंवार झुकतात, त्यांना माना डोलवण्याचा आजार झाला आहे,” असे म्हणत टोला लगावला.

शिंदे यांच्या विधानावर राऊतांचा प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी, “मी डॉक्टर नाही, पण अनेकांचे ऑपरेशन केले आहेत, आणि काहींच्या मानेचे व कंबरेचे पट्टे निघून गेले,” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “त्यांना स्वतःच उपचाराची गरज आहे. त्यांची मान दिल्लीत झुकते, त्यामुळे त्यांच्या पाठीला कणा लावण्याची गरज आहे.”
वक्फ विधेयकावरून सरकारवर निशाणा
राऊत यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरूनही सरकारला धारेवर धरले. “महाराष्ट्र आणि मुंबईतील वक्फ जमिनींचे व्यवहार आधीच पार पडले आहेत. आता त्यांना कायदेशीर रूप देण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “रिक्त वक्फ जमिनींचा सौदा 2 लाख कोटींच्या किंमतीत होणार आहे,” असा दावाही त्यांनी केला.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.