महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील इनकमिंगला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील काही महत्त्वाचे नेते अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोणते नेते सोडू शकतात शरद पवार गट?
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील हे नेते अजित पवार गटाकडे वळण्याची शक्यता आहे –
✔ राहुल मोटे – भूम-परंडा विधानसभा मतदारसंघ, धाराशिव
✔ राहुल जगताप – श्रीगोंदा, नगर जिल्हा (अपक्ष)
✔ विजय भांबळे – सेलू-जिंतूर, परभणी
अजित पवार यांचा निर्णय काय असेल?
या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीविरोधात लढत दिली होती, त्यामुळे अजित पवार त्यांना पक्षात स्थान देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हे नेते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील झाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.