महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या पदासाठी गटाच्या आमदारांमध्ये चर्चा सुरू आहे.

भास्कर जाधव आघाडीवर?
विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्यासह सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, अंतिम निर्णय आमदारांवर सोपवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडीची पुढील रणनीती
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडी (मविआ) आणि ठाकरे गटाच्या आगामी भूमिकेवर चर्चा होणार आहे. तसेच, सत्ताधारी पक्षाविरोधात रणनीती आखण्यावरही भर दिला जाणार आहे.
आता ठाकरे गटाच्या या दाव्याला सत्ताधारी आणि इतर विरोधी पक्ष कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.