नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटले की, “कर्जत-जामखेडमध्ये मी रोहित पवार यांच्या निमंत्रणावर गेलो होतो. तिथले नागरिक माझ्या कानात म्हणाले – ‘खरा नेता राम शिंदेच आहे!

या विधानावर आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना ट्विटद्वारे जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं,
“आदरणीय अशोक चव्हाण साहेब, जर विचारधारेशी निष्ठाच राहिली नाही, तर राजकीय अनुभवाला काही अर्थ उरत नाही. आम्ही नव्या पिढीतील लोक ज्या पुरोगामी मूल्यांवर विश्वास ठेवतो, त्याबाबत जेष्ठ नेत्यांकडून सातत्य आणि प्रामाणिकपणा अपेक्षित असतो. आपल्याबद्दल आदर आहे, पण अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांमधला बदल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खंत वाटायला लावतो. फक्त हेच!”
या विधानातून रोहित पवार यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की, पक्षांतर वा भूमिका बदलण्याची सवय असलेल्या नेत्यांवर नव्या पिढीचा विश्वास कमी होत चालला आहे. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला राजकीय रंग चढलेला असतानाही रोहित पवारांनी संयमित, पण स्पष्ट आणि बोचरे उत्तर दिलं आहे.