सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान कराडने एका कंपनीच्या अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीचे फोन रेकॉर्ड उघड झाले आहेत.

CIDच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा
सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात या फोन कॉल्सचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या संवादामध्ये कराडने संबंधित अधिकाऱ्याला “आहे त्या परिस्थितीत काम बंद करा” अशी धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, त्याने शिवीगाळ देखील केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष
बीड न्यायालयात सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे पुढील तपासात कराडविरोधात आणखी गंभीर पुरावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन खुलास्यांमुळे या प्रकरणात काय नवे ट्विस्ट येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.