वाढदिवशीच मोठी घोषणा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत दिले, लोकसभा निवडणुकीबाबतही व्यक्त केली इच्छा

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र, त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा असल्याचेही स्पष्ट केले आहे.

वाढदिवशीच मोठी घोषणा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत दिले, लोकसभा निवडणुकीबाबतही व्यक्त केली इच्छा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र, त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा असल्याचेही स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीला रामराम, पण लोकसभेची संधी मिळाल्यास तयारी!

लोणीकर यांनी सांगितले की, “आता वय 60 वर्षे पूर्ण झाले आहे आणि निवृत्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही.” परंतु, साधू-संतांचे आशीर्वाद आणि पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणुकीत एकदा नशीब आजमावण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याचा निर्णय – राजकीय चर्चेला उधाण

मराठवाड्यात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवशीच विधानसभा निवडणुकीपासून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सध्या ते परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

त्यांनी जरी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top