एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या संपत्तीबाबत ठाम भूमिका मांडली आहे. “वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची आहे. ती सरकारची नाही, तर मुस्लिम समाजाने दान केलेली संपत्ती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर झाल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा झाली. याआधीही या विधेयकाला विरोध झाला होता, मात्र सरकारकडे बहुमत असल्याने ते हे विधेयक मंजूर करून घेईल, असा अंदाज जलील यांनी व्यक्त केला. मात्र, “आम्हीही तयार आहोत. जर हे विधेयक मंजूर झाले, तर आम्ही न्यायालयात जाऊ. कारण अजूनही आम्हाला देशाच्या न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास आहे,” असे जलील यांनी ठामपणे सांगितले.
या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, वक्फ बोर्ड विधेयकावर पुन्हा एकदा मोठी राजकीय चळवळ होण्याची शक्यता आहे.