लाडक्या बहिणींना १२ वा हफ्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सन्मान निधीची प्रतिक्षा संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली असून, लवकरच महिलांच्या खात्यात हफ्ता जमा होणार आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हफ्ता वितरित केला जाणार असून, कालपासूनच काही पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मागील वर्षी सरकारने दोन महिन्यांचा हफ्ता एकत्र दिला होता आणि त्यामुळे महिलांना ३ हजार रुपये मिळाले होते. मात्र यंदा, एकाच महिन्याचा म्हणजे १५०० रुपयांचा हफ्ता मिळणार आहे.
दरम्यान, योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांविरोधातही कठोर पावले उचलली जात आहेत. आदिती तटकरे यांनी सांगितले की, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे पुढील १५ दिवसांत अपात्र लाभार्थ्यांची माहिती समोर येणार आहे. जर कोणत्याही पुरुषाने अथवा अपात्र व्यक्तीने योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून योजनेच्या प्रगतीची माहिती शेअर करताना सांगितले की, “जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आधार लिंक असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा होईल.” यामध्ये कोणताही गोंधळ न राहावा यासाठी यंत्रणांकडून तांत्रिक प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
या योजनेचा १२ वा हफ्ता महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जमा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे, असंही तटकरे यांनी सांगितलं.
ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, पात्र लाभार्थींनी संयम ठेवावा आणि खात्यात निधी जमा होईपर्यंत अद्ययावत माहिती बँकेकडून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.