लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना महिला दिनाची खास भेट!

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना महिला दिनाची खास भेट! राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील.

फेब्रुवारी-मार्चचे अनुदान कधी मिळणार?

मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ५ आणि ६ मार्चपासून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, आणि ८ मार्च रोजी दोन्ही महिन्यांचा हफ्ता खात्यात येईल.

विरोधकांचा आरोप आणि सरकारचा बचाव

विरोधकांनी दावा केला आहे की, ८० लाख महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. मात्र, अदिती तटकरे यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि सांगितले की, गेल्या महिन्यात दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

महिला दिनानिमित्त विशेष सत्र

८ मार्चला महिला लोकप्रतिनिधींसाठी आणि महिलांसाठी विशेष सत्र होणार आहे. यात महिलांसाठी महत्त्वाच्या योजनांवर चर्चा होईल.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!

या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थींनी आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top