रायगड कार्यक्रमात संभाजीराजेंना डावलल्याने नवा वाद; राम शिंदेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावर अभिवादन केले. या महत्त्वाच्या कार्यक्रमात अनेक मोठे नेते सहभागी झाले होते, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी उदयनराजे भोसलेही कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, संभाजीराजेंना निमंत्रण न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

रायगड कार्यक्रमात संभाजीराजेंना डावलल्याने नवा वाद; राम शिंदेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावर अभिवादन केले. या महत्त्वाच्या कार्यक्रमात अनेक मोठे नेते सहभागी झाले होते, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी उदयनराजे भोसलेही कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, संभाजीराजेंना निमंत्रण न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे माजी प्रमुख असूनही त्यांना कार्यक्रमात आमंत्रित न केल्याचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. यावर भाजप नेते व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला नवा तोंड फुटले आहे.

राम शिंदेंचा ‘विचित्र’ तर्क

नांदेड दौऱ्यावर असताना राम शिंदेंना माध्यमांनी यासंदर्भात विचारले असता, त्यांनी म्हटले की, “या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. उदयन महाराज हे शिवाजी महाराजांच्या थोरल्या घराण्यातील आहेत, त्यामुळे त्यांची उपस्थिती पुरेशी होती.”

त्यांच्या या विधानामुळे अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत की छत्रपती घराण्यातील इतर सदस्यांना डावलून फक्त एका वंशजाला निमंत्रण देणे योग्य आहे का?

मराठी पाठशाळा उपक्रमावर भाष्य

राम शिंदेंनी मराठी भाषा आणि ‘मराठी पाठशाळा’ उपक्रमावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मराठी आपली मातृभाषा आहे. कुणीही हा उपक्रम सुरू करू शकतो. अशा गोष्टी लवकर सुरू झाल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते.”

मिश्किल शैलीत शिंदेंचे भाष्य

राजकीय कारकिर्दीपूर्वी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिंदेंनी विनाअनुदानित शिक्षकांच्या अडचणींबाबत बोलताना मिश्किलपणे सांगितले, “शिक्षक म्हणून मीही कमी पगार घेत होतो, त्यामुळे राजकारणात आलो आणि आता इथे पगार सुरू झालाय.”

सभागृह आणि विद्यार्थी वर्गाची तुलना

सभागृहाच्या व्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांशी तुलना करत सांगितले की, “सभागृहातील सदस्य अनुभवी आणि सराईत असतात. त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी माझ्याकडे विविध उपाय आहेत, ज्यामुळे सभागृह नियंत्रणात राहतं.”

रोहित पवारांवर टीका

राम शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “स्वतःला नाचता येत नसेल तर अंगण वाकडं म्हणणं योग्य नाही,” असा टोला लगावत त्यांनी म्हटले की, “आपली माणसं सांभाळली असती, तर अशा समस्या उभ्या राहिल्या नसत्या.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top