छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री – अजित पवार आणि एकनाथ शिंदे – हे उपस्थित होते.

कार्यक्रमात भाषणांना मर्यादा असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी नसणार होती. मात्र, एकनाथ शिंदे यांना अचानक व्यासपीठावरून बोलण्याची संधी मिळाल्याने, अजित पवार यांना डावलण्यात आलं का, हा प्रश्न उपस्थित झाला आणि राजकीय चर्चांना उधाण आलं.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली की, “कार्यक्रमासाठी वेळ मर्यादित होता, त्यामुळे मी भाषण न करण्याचा निर्णय घेतला.” तसंच, एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अर्थखात्याच्या फायलींबाबत तक्रार केली, असा दावा काही माध्यमांनी केला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “अमित शाह साहेबांनी मला यासंदर्भात काहीही सांगितलेलं नाही. मी सकाळपासून त्यांच्यासोबतच होतो.”
ते पुढे म्हणाले, “शिंदे साहेबांशी आमचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. त्यांना काही सांगायचं असेल, तर ते थेट माझ्याशी बोलतात. आम्ही महत्त्वाच्या विषयांवर नेहमी एकत्र बसून चर्चा करतो आणि निर्णय घेतो.”
रायगडच्या पालकमंत्रिपदावरही प्रश्न विचारला असता, अजित पवारांनी सांगितलं, “सगळं सुरळीत आहे. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि त्याची माहिती तुम्हालाही दिली जाईल.